पुन्हा तीच चूक..

 

तिच्याशी काही ही न बोलता
मला खूप काही बोलायचं होतं
करून दुर्लक्ष तिला, फक्त
तिलाच बघत रहायचं होतं..
मनात जरी होतं नाव तिचं,
पण ओठांवरती लपवायचं होतं..
तिच्याकडूनच तर शिकलो मी, कि
डोळ्यातून अश्रू जरी वाहत असले,
मात्र सर्वांसमोर सारखं हसत रहायचं,
हेच तिला एकदा कळवायचं होतं

ती माझी कधीच नव्हती,
पण आज मी तिला गमावलं..
काळजात दगड ठेवून माझ्या
मनाला मी समजवलं,
कि वेड्या, असं काहीच नसते,
आयुष्यात सर्व क्षणिक असते,
आजचं सुख उद्याचं दुःख असतो,
त्या दुःखात सोबत कुणीच नसतो,
फक्त असते त्या आठवणी,
खोलवर रुजलेल्या ध्यानीमनी,
आणि असतो एकटाच तू,
भरकटलेला, हरवलेला..

वारंवार सारखी तीच चूक
माझ्याकडून का होत आहे?
अजून भरले नाहीत घाव जुने,
उलट खोल आणखी का होत आहे?
वेड्या मनाला समजतच नाही,
पुन्हा तीच ओढ का लावून घेत आहे?
जाणीव असूनही की याची किंमत
शेवटी मलाच चुकवायची आहे,
माझ्या शिल्लक आयुष्यातून,
तिच्या आठवणींच्या अश्रूंनी..

 

 

 

 

© कार्तिक मिश्रा

 

 

 

Leave a comment